Sunday, October 19, 2008

जोगेश्वरी देवी

मी आज आपल्याला आणखी एका जागृत देवस्थानाचे दर्शन घडवून आणणार आहे. ते म्हणजे औरंगाबादजवळील घाटनांद्रा येथील "देवी जोगेश्वरी" चे. हे एक जागृत देवीचे स्थान असून खान्देशवासीयांचे कुलदैवत सुध्दा आहे. येथील निसर्ग पाहण्याजोगा असून हे एक पर्यटनाच्या दृष्टीनेहि चांगले ठिकाण आहे.

Friday, October 10, 2008

खान्देशवासीयांचे कुलदैवत- मनुदेवी

महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना वेगळे करणार्‍या सातपुडा पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र मनुदेवी हे खान्देशवासियांचे कुलदैवत वसले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल-चोपडा महामार्गाच्या उत्तरेस असलेल्या कासारखेडे-आडगाव गावापासून साधारण 8 किलोमीटरवर मनुदेवीचे प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजुंनी पर्वतराजी आणि हिरवळीने नटलेला आहे. संपूर्ण खान्देशातील नागरिक येथे पायी, वाहनाने येवून नवसाला पावणार्‍या मनुदेवीचे श्रध्देने दर्शन घेतात.
मनुदेवीच्या इथल्या वास्तव्यामागेही कथा आहे. इसवी सन पूर्व 1200 मध्ये सातपुडा पर्वत परिसरातील 'गायवाडा' येथे ईश्वरसेन नावाचा गवळी राजा राज्य करत होता. त्याच्याकडे भरपूर गायी होत्या. त्यातील काही गायी महाराष्ट्रातील तापी नदीवर तर काही मध्यप्रदेशातील नर्मदेवर पाणी पिण्यास जात असत. त्या काळी 'मानमोडी' या आजाराची साथ संपूर्ण सातपुडा परिसरासह खान्देशात पसरली. 'मानमोडी'ने अनेक लोक व गायी मृत्युमुखी पडल्या. 'मानमोडी' टाळण्यासाठी ईश्वरसेन राजाने 'गाववाडा' पासून 3 किलोमीटरवर जंगलात इसवी सन पूर्व 1250 मध्ये मनुदेवीची स्थापना केली. देवीचे मंदिर उभारले. मनुदेवी मंदिरापासून ते गायवाडा या तीन किलोमीटवर ठिकठिकाणी दिसणारी 13 फूट रूंद भिंत आजही त्याची साक्ष देते. मानमोडी व दानवापासून देवांचे रक्षण करण्यासाठी मनुदेवीला अवतार धारण केला असा उल्लेख देवी भागवतातही आढळतो. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी मनुदेवी सातपुड्यात वास करेल, असे श्रीकृष्णाने मथुरेला जाताना म्हटले होते, अशी आख्यायिका आहे.

मंदिराच्या परिसरात सात ते आठ विहिरी आढळतात. मंदिरातील मनुदेवीची काळ्या पाषाणाची शेंदूर लावलेली मूर्ती, गणपती, तसेच शंकराची पिंड, अन्नपूर्णा मातेची मूर्ती मंदिराचे बांधकाम करताना उत्खननात सापडल्या आहेत. मंदिराच्या चहुबाजुंनी उंच उंच कडे आहेत तर मंदिराच्या समोर असलेल्या सुमारे 400 फुट उंचीच्या कड्यावरून कोसळणारा 'कवठाळ' नदीचा नममोहक धबधबा भक्तांना आलेला प्रवासातील क्षीण नाहीसा करतो. कवठाळ नदीचे पाणी पाझर तलावात अडविण्यात आले आहे.

मनुदेवीच्या वर्षभरातून चार यात्रा असतात. चैत्र माघ शुध्द अष्टमीला नवचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी पिठोरी आमावस्येला यात्रा भरते. नवरात्रीचे पूर्ण दहा दिवस यात्रा असते. खान्देशातील लाखो भाविक देवीचे मनोमावे दर्शन घेवून नवस फेडतात. खान्देशातील नवदाम्पत्य देवीच्या दर्शनानंतरच संसाराला सुरवात करतात. वर्षभर येथे भाविकांचे रेलचेल सुरूच असते. 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर पूजेच्या साहित्यांची दुकाने आहेत. पूर्वी मनुदेवीला येण्यासाठी सातपुड्याच्या जंगलातून केवळ एकच पायवाट होती. आता तेथे शासन व सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने खडीकरण व कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.

जायचे कसे?
रस्ता मार्ग - यावल व चोपड्याहून आडगाव (मनुदेवीचे) पर्यंत बससेवा आहे. तेथून रिक्षांने जावे लागते. किंवा खाजगी वाहनाने थेट मनुदेवीच्या मंदिरापर्यंत जाता येते.

रेल्वे मार्ग- भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. तेथे सर्व राज्यामधून येण्यासाठी रेल्वेगाड्या आहेत.

संदीप पारोळेकर

Friday, September 5, 2008

तरसोदचा जागृत गणपती



जळगाव- भुसावळ महामार्गावर जळगावपासून आठ किमी अंतरावर तरसोद फाटा आहे. या फाट्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर शिवकालीन गणरायाचे जागृत देवस्थान आहे. संपूर्ण जळगाव जिल्हयातील भाविक संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारिका चतुर्थी तसेच गणेशोत्सवात या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. गणपती मंदिराचे द्वार अगदी लहान आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी वाकून जाऊन दर्शन घ्यावे लागते. श्रीगणेशाची मूर्ती 5 ते 6 फूटाची असून तेजस्वी आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


Monday, May 12, 2008

भारतीय भित्तीपत्रकांचा जगप्रसिध्द अनमोल ठेवा - ’अजिंठा लेणी’



प्राचीन शैलग्रुहे व भित्तीचित्रे यांचे एक अप्रतिम जगप्रसिध्द स्थळ म्हणजे ’अजिंठा लेणी’ होय. फ़र्दापूरची लेणि असाही उल्लेख करण्यात येतो. बौध्द लेण्यांसाठी सुप्रसिध्द असे हे स्थान आहे. सह्याद्री पर्वताच्या सातमाळ रांगेतील इंध्याद्री शाखेत ही लेणी खोदलेली आहे. अजिंठा लेणी डोंगरांच्या एका रांगेत असून तिच्या समोर डोंगरांची दुसरी रांग आहे. डोंगराच्या एका कड्यावरून घाटमाथ्यावरचो पाणी खाली दरीत धबधब्याच्या रूपाने कोसळते आणि लेण्याच्या समोरून वाहत जाते. या जलप्रवाहाचीच पुढे वाघुर नदी तयार होते.


३० गुफ़ांची मालिका -


ज्या पहाडात लेणी खोदलेली आहेत, त्याची उंची सुमारे अडीचशे फ़ुटापर्यंत आहे. एकुण ३० बौध्द आहेत. त्यातील ४ चैत्यग्रुहे असून बाकीचे विहार आहेत. पूर्वी प्रत्येक गुंफ़ा स्वयंपूर्ण होती. प्रत्येक गुंफ़ेतुन खाली झर्यापर्यंत जाण्यासाठी पायर्या होत्या. आता त्या नष्टप्राय झाल्या आहेत.


चित्रकलेसाठी प्रसिध्द -


अजिंठ्याची लेणी वस्तुकला व मूर्तीकलेसाठी प्रसिध्द असली तरी चित्रकलेसाठी विशेष प्रसिध्द आहे. चित्रे काढण्यासाठी भिंतीवर प्रथम माती, शेण व दगडांची पूड एकत्र करून त्याचा लेप देऊन बनविण्यात आली आहे. छतासाठी भाताचा तूस किंवा ताग यांचा उपयोग केला आहे. त्यावर चुन्याचा हात मारून गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात रंग भरण्यात आले. चित्रकारांनी पांढरा, काळा, तांबडा, निळा, हिरवा, पिवळा या रंगांना विशेष प्राधान्य दिले आहे. विशिष्ट जातीची माणसे एका खास रंगानेच रंगविण्यात आली आहे.


स्त्रियांच्या चित्राक्रुती आकर्षक -


चित्रातील बहुतेक प्रसंग बुध्दांच्या कथांमधून निवडण्यात आले आहे. स्तंभ व छतांवर वेलबुट्टी अप्रतिम काढण्यात आली आहे. महिलांची चित्रे अतिशय सुंदर आहेत. गोरी व सावळी, कुमारीका व प्रौढा, आभूषण धारण केलेल्या स्त्रिया अप्रतिम आहे. विविध देवदेवता, यक्श, किन्नर, गंधर्व, अप्सरा यांचीही चित्रे साकारण्यात आली आहेत. पशू - पक्शींचाही त्यात समावेश आहे. काही लेणी अपूर्ण आहेत तर काही खराब झालेल्या आहेत.



इतर वैशिट्ये -


शिल्प व चित्र या द्रुष्टीने ही लेणी विशेष प्रेक्शणीय़ आहे. याशिवाय बुध्दाचा महापरिनिर्वाणाचा प्रसंग गुंफ़ा २६ मध्ये कोरलेला आहे. गौतम बुध्दाच्या मूर्तीची लांबी २३ फ़ूट असूनही मुद्रेवरील भाव सुरेख दिसतात. बुध्दाची मुद्रा शांत असून त्यांच्याजवळ असलेल्या सर्व शोकग्रस्त व्यक्तींच्या मुखावर दु:खाची छाया स्पष्ट दिसते.


प्राण्यांचे चित्रण -


एक नंबरच्या गुंफ़ेतील बैलांची झुंज प्रेक्शणीय़ आहे. याच गुंफ़ेत चार हरणांचे एक खास शिल्प आहे. एका चौकटीत २ उभी व २ बसलेली अशी चार हरणे आहे. पण या सगळ्यांना मिळून एकच तोंड आहे.


लेण्यातील बरीचशी चित्रकला आज अंधुक व अस्पष्ट होत आहे. या भित्तीचित्रांचे जतन करणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे.